मुंब्य्रातून अल्पवयीन मुलीची सुटका

By Admin | Updated: July 27, 2015 23:45 IST2015-07-27T23:45:49+5:302015-07-27T23:45:49+5:30

तुर्भे येथून पळवलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. जीवे मारण्याची धमकी देत तिला पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

Minor girl rescued from Mumbra | मुंब्य्रातून अल्पवयीन मुलीची सुटका

मुंब्य्रातून अल्पवयीन मुलीची सुटका

नवी मुंबई : तुर्भे येथून पळवलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. जीवे मारण्याची धमकी देत तिला पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
तुर्भे गाव येथून १६ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानुसार या मुलीच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाने मुंब्रा येथून मुलीची सुटका केली आहे. मानखुर्द येथे राहणाऱ्या सोहेल शेख (२३) याने त्या मुलीचे अपहरण केले होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत असून त्यासंबंधीची चौकशी सुरू आहे, तर त्याचे वडील अबुबकर शेख हा देखील एका गुन्ह्यात कोठडीमध्ये आहे.
तुर्भे गाव परिसरात सोहेल फिरत असताना त्याची अल्पवयीन मुलीवर नजर पडली. त्यावेळी तिला धमकावून सोहेलने मुंब्रा येथील त्याच्या मावशीच्या घरी पळवून नेले. तिथे मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. यावेळी तरुणीचा विरोध असतानाही तिच्यावर बलात्कार देखील केला. याकामी नातेवाइकांनी त्याला मदत केल्याचे पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांनी सांगितले. सोहेल याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl rescued from Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.