उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार....वेस्टर्न
By Admin | Updated: August 25, 2014 22:57 IST2014-08-25T22:57:50+5:302014-08-25T22:57:50+5:30
उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार....वेस्टर्न
उ ्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीवर बलात्कारबोरिवली पोलिसांनी मिर्झापूरला गुन्हा केला वर्गमुंबई: उत्तरप्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्र ार मिर्झापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पीडित मुलगी मिर्झापूरमध्ये घरासमोर झाडू मारत असताना ५-६ जणांनी तिला पळवून नेले होते. त्यानंतर तिला लखनऊ येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला तेथून रेल्वेने दादर स्थानकात आणण्यात आले. त्या पाच जणांनी तिच्याकडील चांदीच्या वस्तू आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर मुलीची पाच जणांनी नजर चुकवून तिथून पळ काढला. पीडित मुलगी कशीबशी गोरेगाव स्थानकात पोहचली. तिथे तिने एका महिलेला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्वयंसेवी संस्था व महिला पोलिसांच्या मदतीने बोरिवली रेल्वे पोलिसांनी तिला बोलते केले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात जणांविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बोरिवली रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी.बागल यांनी दिली आहे.