आधी डोळा मारला नंतर अश्लील स्पर्श..; नामांकित हॉटेलमध्ये वेटरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By मनीषा म्हात्रे | Updated: August 31, 2023 19:37 IST2023-08-31T19:37:47+5:302023-08-31T19:37:52+5:30
वांद्रे येथील घटना, जुहू परिसरात १३ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते.

आधी डोळा मारला नंतर अश्लील स्पर्श..; नामांकित हॉटेलमध्ये वेटरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मुंबई - कुटुंबीयांसोबत जेवणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला वेटरने डोळा मारून अश्लील स्पर्श केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथील एका नामंकित हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी वेटरला अटक केली आहे. शाहबाद खान रफाद खान (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जुहू परिसरात १३ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते. रविवारी रात्री साडे दहा वाजता अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत जेवणासाठी वांद्रे पश्चिमेकडील फर्नाडिस व्हिला हिला रोड येथील एका नामंकित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. यावेळी ऑर्डर घेण्यासाठी आलेला वेटर तिला एकटक पाहत होता. काही वेळाने तिला डोळा मारला. काही वेळाने फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी मुलीच्या दिशेने फेकून तिला अश्लील स्पर्श करून पुढे गेला. काही वेळाने मुलीने घडलेला प्रकार पालकांनी त्याला जाब विचारला. घटनेची वर्दी लागताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा नोंदवत आरोपीला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.