अल्पवयीन मुलीचे पोलीस ठाण्यातून अपहरण?

By Admin | Updated: May 6, 2015 02:14 IST2015-05-06T02:14:43+5:302015-05-06T02:14:43+5:30

मानखूर्दमध्ये राहाणाऱ्या अल्पवयीन तरूणीला सलमान खान(२४) या मुलाने पळवून नेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे आई-वडील पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे.

Minor girl kidnapped from police station? | अल्पवयीन मुलीचे पोलीस ठाण्यातून अपहरण?

अल्पवयीन मुलीचे पोलीस ठाण्यातून अपहरण?

मुंबई : मानखूर्दमध्ये राहाणाऱ्या अल्पवयीन तरूणीला सलमान खान(२४) या मुलाने पळवून नेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे आई-वडील पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मात्र पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने मुलीचा शोध घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाम्पत्याने या प्रकरणाला वाचा फोडली. सलमानसोबत आपल्या मुलीचा विवाह ठरवण्यात आला होता. दोघांचा साखरपुडाही झाला. मात्र सलमानबाबत काही बाबी उशिरा समजल्यानंतर हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मात्र सलमान मुलीला त्रास देऊ लागला. त्याची तक्रार करण्यासाठी कुटुंबाने थेट सलमानचे घर गाठले.तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सलमानच्या कुटुंबाने पोलिसांना बोलावले. लागलीच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करत असताना सलमानने मुलीचे अपहरण केले, असा आरोप हे दाम्पत्य करते. तसा गुन्हाही घाटकोपर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. ३ जानेवारीपासून अपहरण झालेल्या मुलीसोबत अद्याप संपर्क न झाल्याने हे दाम्पत्य भयभीत आहे. जानेवारी महिन्यात पोलिसांनी दोनवेळा सलमानचा फोन ट्रेस करत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र ते अपयशी ठरले. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडलांनी सलमानला फेब्रुवारी महिन्यात घाटकोपर परिसरातच पाहिल्याचा दावा केला. त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो निसटला. २१ मे रोजी मुलीला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सलमान तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याची भीती कुटुंबाला आहे. परिणामी पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करून मुलीचा शोध घेण्याची मागणी शेख कुटुंबाने केली आहे.
याबाबत घाटकोपर पोलिसांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही मर्यादा असल्याने आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl kidnapped from police station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.