Join us

मुंबईकरांसाठी खूषखबर! फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:24 IST

एसी लोकलपाठोपाठ फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात

मुंबई: एसी लोकलच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आल्यानंतर रेल्वेनं मुंबईकरांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसी लोकलपाठोपाठ फर्स्ट क्लासचा प्रवासही स्वस्त झाला आहे. 

मुंबई लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या सिंगल तिकिटात ५० टक्क्यांनी कपात झाली आहे. आता ५० रुपयांचं तिकीट २५ रुपयांना मिळेल. पण हा बदल केवळ सिंगल तिकीट दरात झालेला आहे. मासिक पासचे दर जैसे थेच आहेत. मासिक पास जुन्याच दरानं मिळणार आहे. नवे दर ५ मेपासून लागू होणार आहेत. 

दोनच दिवसांपूर्वी एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. एसी लोकलपाठोपाठ फर्स्ट क्लासच्या तिकीट दरातही कपात करण्यात आल्यानं मुंबईकरांना फायदा होणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकल