अवजड उद्योग मंत्रालय स्वयंपूर्ण करणार !

By Admin | Updated: May 31, 2014 02:19 IST2014-05-31T02:19:41+5:302014-05-31T02:19:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखाली परिपूर्ण आणि सर्वसमावेशक छोटेखानी मंत्रिमंडळ कार्यरत झाले आहे. या मंत्रिमंळात अवजड उद्योग या विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे

The Ministry of Heavy Industries will be self-sufficient! | अवजड उद्योग मंत्रालय स्वयंपूर्ण करणार !

अवजड उद्योग मंत्रालय स्वयंपूर्ण करणार !

अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखाली परिपूर्ण आणि सर्वसमावेशक छोटेखानी मंत्रिमंडळ कार्यरत झाले आहे. या मंत्रिमंळात अवजड उद्योग या विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. अवजड उद्योग मंत्रालयाकडे बघण्याच्या दृष्टीकोन वेगळा आहे. हा दृष्टीकोनच बदलण्याचे आव्हान मी स्विकारले असल्याचे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री तथा रायगडचे खासदार अनंत गीते यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. रायगडचे खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार अनंत गीते विजयी झाल्यानंतर त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेवून केंद्रीय मंत्रिमंडळातील अवजड उद्योग विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते आज प्रथमच रायगडमध्ये आले होते. अवजड उद्योग खात्याच्या स्वीकार-अस्विकाराच्या मुद्याच्या अनुषंगाने गिते म्हणाले, आपल्या भारताच्या औद्योगिक विकासात मागे वळून पाहिले तर अवजड उद्योग हा विभाग पूर्वी अग्रस्थानी होता. कालपरत्वे सरकारी धोरणामुळे हा विभाग पिछाडीला गेला आहे. अशा प्रतिकूल काळात ही जबाबदारी मोदी सरकारने माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी आता मी स्विकारली असून, अवजड उद्योग विभाग स्वयंपूर्ण बनविणार असल्याचा निर्धार त्यांनी पुढे व्यक्त केला. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे आज जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत आणि सत्कार करण्यात आले. अलिबाग शहराच्या सीमेवर अलिबाग तालुका सेना प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व अलिबाग शहर सेना प्रमुख कमलेश खरवले यांनी गीते यांचे पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले. तर शहर शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेले होते. दिल्ली-मुंबई कॉरिडोरला शिवसेनेचा विरोध नाही तर याचाच भाग असणार्‍या दिघी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे.सरकारमध्ये असलो तरी तो कायमच राहील. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत धोरणात्मक निर्णय हे शिवसेना पक्षप्रमुख घेतील. अवजड उद्योग विभागाचा फायदा निश्चितच कोकणाला मिळवून देणार आहे. अलिबाग येथे प्रलंबित असणारा रेल्वेचा प्रश्न, आर.सी.एफ. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढे शेतकरी कामगार पक्षाबरोबर शिवसेना नाही रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये यापुढे शेतकरी कामगार पक्षाबरोबर शिवसेना राहणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार लढतील अशी स्पष्टोक्ती देखील गीते यांनी यावेळी केली. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उत्तम कोळंबे, तालुका उद्योग सेनेचे अध्यक्ष रुपेश जामकर, अलिबाग शहर अध्यक्ष कमलेश खरवले, उपाध्यक्ष रोशन पवार, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत पाटील, तालुका संपर्क प्रमुख कृष्णा म्हात्रे, वावे शाखा प्रमुख प्रकाश गायकर, रायगड जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णा साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Ministry of Heavy Industries will be self-sufficient!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.