मंत्र्याच्या मुलाकडून क्लबमध्ये गोळीबार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:21 IST2018-06-26T03:21:18+5:302018-06-26T03:21:22+5:30

‘बारबाले’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मंत्र्यांच्या मुलाने क्लबमध्ये गोळीबार करण्याची घटना आंबोलीच्या एका नामांकित क्लबमध्ये रविवारी सकाळी घडली.

Minister's son fired in the club? | मंत्र्याच्या मुलाकडून क्लबमध्ये गोळीबार?

मंत्र्याच्या मुलाकडून क्लबमध्ये गोळीबार?

मुंबई : ‘बारबाले’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मंत्र्यांच्या मुलाने क्लबमध्ये गोळीबार करण्याची घटना आंबोलीच्या एका नामांकित क्लबमध्ये रविवारी सकाळी घडली. मात्र पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अंबोलीच्या एका क्लबमध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा हा पूत्र त्याच्या सुरक्षारक्षकासह शनिवारी रात्री दाखल झाला. त्याच्यासोबत मालाडमधील एका मोठया बारमधील बारबाला निशा होती. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो बारमध्ये आला होता. या सेलिब्रेशन दरम्यान रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्याने क्लबमध्ये चक्क तीन राऊंड फायर केले. क्लबमध्ये प्रवेश करतानाच त्याने आम्हाला शस्त्रास्त्र आणि सुरक्षारक्षकांसह प्रवेश दिल्यास एका रात्रीचे पाच लाख रुपयांचे बील देवू, अशी आॅफर मंत्री पूत्राने दिली क्लबच्या व्यवस्थापनाला दिली होती. त्यामुळे त्याला कोणी आडकाठी केली नाही. सकाळी हवेत फायरिंग केल्याने या प्रकाराची वाच्यता झाली. मात्र क्लबचे व्यवस्थापन त्याबाबत मूग गळून असून अंबोली पोलिसांनीही त्याकडे कानाडोळा केला आहे. या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Minister's son fired in the club?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.