Join us

मंत्री, पोलिस अधीक्षकांना ड्रग्ज तस्करीतील हप्ता; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:36 IST

अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा आरोप केला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ड्रग्ज तस्करीतून मिळणाऱ्या पैशांचा हप्ता राज्यातील मंत्री, मंत्र्याचे जावई आणि पोलिस अधीक्षकांपर्यंत जात असून पोलिस अधीक्षक महिन्याला ३ कोटींचा हप्ता घेतो, असा आरोप करत याचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. 

अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा आरोप केला.

जनतेच्या हाती दिला भोपळा : दानवेnअंतरिम अर्थसंकल्पात सरकारने कंत्राटदारांना पोसण्याचे काम केले असून जनतेच्या हाती केवळ भोपळा दिला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. nसरकारने आणलेले सहकार विधेयक एकाधिकारशाही निर्माण करणारे असल्याने ते चिकित्सा समितीकडे पाठविले, हे आमचे यश आहे, असेही दानवे म्हणाले.

टॅग्स :विधानसभाविजय वडेट्टीवार