सवरांचे मंत्रीपद वांझोटे :समस्या कायम
By Admin | Updated: May 12, 2015 03:41 IST2015-05-12T03:41:53+5:302015-05-12T03:41:53+5:30
अनेक आश्वासन देत भाजपाचे खासदार व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचे आमदार निवडून आले. वसई, नालासोपारा व बोईसर वगळता अन्य

सवरांचे मंत्रीपद वांझोटे :समस्या कायम
दीपक मोहिते, वसई
अनेक आश्वासन देत भाजपाचे खासदार व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचे आमदार निवडून आले. वसई, नालासोपारा व बोईसर वगळता अन्य विधानसभा मतदारसंघ युतीच्या ताब्यात गेले. पालकमंत्री म्हणून विष्णू सावरा यांनी पदभार सांभाळला. त्यांच्या मंत्रीपदाचा वर्धापनदिनही सरला मात्र पालघर जिल्ह्यातील समस्या काही सुटल्या नाही. आजही येथील येथील नागरिक ‘अच्छे दिन’ च्या प्रतीक्षेत आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अॅड. चिंतामण वनगा प्रचंड मताधिक्याने निवडणूक आले. मागील दोन टर्ममध्ये त्यांंना मतदारांनी चकमा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकली. ते यापूर्वीही खासदार होते. नव्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचेही त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना जिल्ह्यातील प्रश्नाची जाण आहे येथील प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांची होती. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.