मंत्री अनिल परब यांच्याबाबत ईडी टाकणार आस्ते कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:42+5:302021-09-02T04:13:42+5:30

जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची अनेक ...

Minister Anil Parab will take ED step slowly | मंत्री अनिल परब यांच्याबाबत ईडी टाकणार आस्ते कदम

मंत्री अनिल परब यांच्याबाबत ईडी टाकणार आस्ते कदम

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची अनेक प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. मात्र त्यासाठी आस्ते कदम टाकत प्रत्येक प्रकरणासाठी स्वतंत्रपणे त्यांना पाचारण केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या ईडीच्या सूचनेला न जुमानता परब यांनी दोन आठवड्यांची मुदत मागवून घेतली. त्याचप्रमाणें नेमक्या कोणत्या कारणासाठी चौकशी करायची आहे, त्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे परब ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच ईडीची चौकशी लांबणीवर टाकतील, अशी शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याकडील चौकशी त्याच पध्दतीने दीर्घकाळ चालविली जाणार आहे.

मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यात मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एका अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींवर चौकशी केली जाणार आहे. मात्र या तीनही प्रकरणात परब यांच्या थेट सहभागाप्रकरणी एकही पुरावा नाही. परिवहन विभागातील कथित बदल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चौकशी करून त्यांना क्लीनचिट दिली आहे.

Web Title: Minister Anil Parab will take ED step slowly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.