Join us  

"नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 3:38 PM

मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर निशााणा साधला आहे.

मुंबई: नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली होती. नाणारला ८० टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचं सांगतिलं जात आहे. त्यावर नारायण राणेंनी टीका केली होती. तसेच नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं स्पष्टीकरणही नारायण राणे यांनी दिलं आहे. नारायण राणे या विधानानंतर आता मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी निशााणा साधला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे. गुलाबराव पाटील यांच्या या टीकेनंतर नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. तसेच नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण राणे यांनी जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. 

शिवसेनेसाठी नाणार हा विषय संपलेला आहे- उदय सामंत

मालवण वायंगणी- तोंडवळी येथील नियोजित सी- वर्ल्ड प्रकल्प कमीत कमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे. पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय किंवा खाजगी संस्थेंमार्फत प्रकल्प उभारु, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच नाणार प्रकल्प शिवसेनेसाठी संपलेला आहे. मात्र तरीही काहीजण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करत आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

टॅग्स :नारायण राणे शिवसेनानाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पमहाराष्ट्र सरकार