असहिष्णुतेविरोधात धर्मनिरपेक्ष संघटनांचा किमान समान कार्यक्रम
By Admin | Updated: November 16, 2015 03:00 IST2015-11-16T03:00:02+5:302015-11-16T03:00:02+5:30
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध विविध धर्मनिरपेक्ष संघटनांसमवेत किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये आता देशातील मुस्लीम

असहिष्णुतेविरोधात धर्मनिरपेक्ष संघटनांचा किमान समान कार्यक्रम
जमीर काझी, मुंबई
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध विविध धर्मनिरपेक्ष संघटनांसमवेत किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये आता देशातील मुस्लीम समाजाची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानेही सहभाग घेतला आहे.
देशाच्या संविधानाचे पायाभूत तत्त्व असलेल्या धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्वाच्या बचावासाठी देशभरात मोहीम राबविली जाणार आहे.
परिसंवाद, चर्चासत्र व मेळाव्यातून ही जनजागृती केली जाईल. या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मुंबईत शिखर परिषद झाली. त्यात कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘मूव्हमेंट टू सेव्ह फेथ अॅण्ड सेव रिलिजन’चे सहनिमंत्रक मौलाना सज्जाद नोमाणी, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, कॅथॉलिक सभेचे माजी अध्यक्ष डॉल्फी डिसोजा आदींनी देशातील बिघडत्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीबाबत मते मांडली. यावर मौलाना नोमाणी म्हणाले, ‘देशाच्या धर्मनिरपेक्षतेला कोणत्याही प्रकारची बाधा आणणाऱ्यांविरोधात आम्ही नेहमी आवाज उठवू व असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.’ तर डिसोजा यांनी सांगितले, ‘देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य व भाषणाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.