लाखो रुपयांचे रक्तचंदन जप्त

By Admin | Updated: February 8, 2015 22:40 IST2015-02-08T22:40:59+5:302015-02-08T22:40:59+5:30

नागपूर येथून उरणकडे निघालेल्या संशयास्पद कंटेनरला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यावर या कंटेनरमध्ये

Millions of rupees recovered | लाखो रुपयांचे रक्तचंदन जप्त

लाखो रुपयांचे रक्तचंदन जप्त

खालापूर : नागपूर येथून उरणकडे निघालेल्या संशयास्पद कंटेनरला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यावर या कंटेनरमध्ये लाखो रुपये किमतीचे रक्तचंदन सापडले आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरचा चालक व क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात एखादी टोळी कार्यरत असावी, असा अंदाज वर्तवला आहे.
याबाबत खोपोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागपूर येथून (एमएच०४-एफडी८१९१) या क्रमांकाचा कंटेनर उरण येथील न्हावाशेवा येथे चालला होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आलेल्या या कंटेनरचा पोलिसांना संशय आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व खोपोली पोलिसांनी कंटेनर चालकाला कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. कंटेनरमध्ये काय आहे, याची चौकशी केली असता चालकाने तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना दिली. कंटेनरला कस्टमचे सील असल्याने तो उघडण्यासाठी पोलिसांनी कस्टमच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रक्तचंदन चोरून नेणारी मोठी टोळी या प्रकरणात कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला.
दरम्यान, उशिरापर्यंत तांदळाच्या गोणी व रक्तचंदन मोजण्याचे काम सुरू होते. यामुळे नक्की जप्त केलेला माल किती रुपयांचा आहे, हे स्पष्ट झाले नव्हते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, खोपोली पोलीस, वनविभाग व कस्टम यांच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई केली. जप्त केलेला माल काही लाखांच्या घरात आहे. (वार्ताहर)

Web Title: Millions of rupees recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.