पोर्नोग्राफी प्रकरणात सव्वासात कोटी गोठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:05 IST2021-07-23T04:05:43+5:302021-07-23T04:05:43+5:30

अश्लील व्हिडिओच्या मुंबई ते लंडन चालणाऱ्या रॅकेटमधील आर्थिक उलाढालीचा गुन्हे शाखा तपास करीत आहे. यासाठी राज कुंद्रा आणि अन्य ...

Millions froze in pornography case | पोर्नोग्राफी प्रकरणात सव्वासात कोटी गोठविले

पोर्नोग्राफी प्रकरणात सव्वासात कोटी गोठविले

अश्लील व्हिडिओच्या मुंबई ते लंडन चालणाऱ्या रॅकेटमधील आर्थिक उलाढालीचा गुन्हे शाखा तपास करीत आहे. यासाठी राज कुंद्रा आणि अन्य आरोपींमध्ये ई-मेल्स आणि व्हाॅट्सॲप चॅटसोबतच बँक खात्यातील व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. याच कारवाईचा भाग म्हणून राज कुंद्रा याच्याशी संबंधित तसेच अटकेतील आरोपींच्या विविध बँक खात्यातील एकूण सव्वासात कोटी रुपये पोलिसांनी गोठविले आहेत.

विविध बँक खात्यांमधील गोठविलेल्या रकमेचा तपशील

- यास्‍म‍िन रसूल बेग खान ऊर्फ रोआ खान - ३४ लाख ९० हजार

- दीपांकर पारितोष खासंविसव ऊर्फ शान - (दोन बँक खात्यातून) १ लाख २० हजार

- गहना वशिष्ठ - (३ बँक खात्यातून) ३७ लाख

- उमेश कामत - ६ हजार

- तन्वीर हाश्मी - (दोन बँक खात्यातून) ६ लाख

- यश ठाकूर ऊर्फ अरविंद कुमार श्रीवास्तव - १ कोटी ८१ लाख

- हर्षिता श्रीवास्तव - कानपूरमधील बँक खात्यातील २ कोटी ३२ लाख

- नर्बदा प्रसाद श्रीवास्तव - कानपूर बँक खात्यातील ५ लाख ५९ हजार

- फ्लीझ मुव्हीज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडच्या भोपाळमधील बँक खात्यातून १ कोटी ५८ लाख ८७ हजार तर मेरठमधील खात्यातील ७३ लाख ८७ हजार रुपये.

Web Title: Millions froze in pornography case