घर घेऊन देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
By Admin | Updated: January 28, 2015 23:06 IST2015-01-28T23:06:08+5:302015-01-28T23:06:08+5:30
घर घेऊन देतो, असे सांगून रंजन याने ढोकाळी येथील शकुंतला रॉय यांची २० लाख २५२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर घेऊन देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
ठाणे : घर घेऊन देतो, असे सांगून रंजन याने ढोकाळी येथील शकुंतला रॉय यांची २० लाख २५२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजन याने रॉय यांना घर घेऊन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेगवेगळ्या दिवशी रोख आणि धनादेशाद्वारे २३ लाख ३६ हजारांची फसवणूक केली.
रॉय यांनी त्यांच्याकडे वारंवार विचारणा केल्यानंतर तीन लाख आठ हजारांची रक्कम त्याने परत केली. त्यानंतर, मात्र त्याने पैसे किंवा घर यापैकी काहीही त्यांना दिले नाही.
हा प्रकार २०१२ ते २०१३ दरम्यान कापूरबावडी येथे घडला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २२ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास सुरू असून यातील आरोपीला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)