बनावट कागदपत्रांद्वारे लाखोंची फसवणूक
By Admin | Updated: May 12, 2015 03:31 IST2015-05-12T03:31:17+5:302015-05-12T03:31:17+5:30
जमीन खरेदी-विक्री व्यवहाराकरिता, माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया माणूस उभा करून फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे लाखोंची फसवणूक
अलिबाग : जमीन खरेदी-विक्री व्यवहाराकरिता, माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया माणूस उभा करून फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेत बनावट नावाने खाते उघडून, बनावट सरकारी दस्त तयार करून तब्बल ३५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक गंगाराम नरे (रा. तळा), दीपाली बाळाराम सकपाळ (रा. इंदापूर), रोहन राजेंद्र राजपूरकर (रा. इंदापुर), कुलदीप ईश्वर विंचुरा (रा. इंदापुर), अमर जयवंत कोडेरा (रा. निळज-माणगाव), प्रथमेश दिलीप काकडे आणि अजित रामचंद्र घोडके (दोन्ही रा. समर्थ कॉलनी, नवेनगर, ठाणे) या सात जणांविरुद्ध माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सात जणांनी माणगाव तालुक्यातील मौजे भाले या गावातील गट नं. ९१:८ क्षेत्र हे.आर. ४:९४:० आकार रु. १.५० ही मिळकत चेतन दिनेश जोशी (रा.भाले) यांच्या मालकीची असताना त्याच्या नावाने दीपक गंगाराम नरे या तोतया माणसास उभे केले. नरे यांचे खोटे बनावट निवडणूक ओळखपत्र तसेच बँकेत बनावट खाते उघडण्यात आले. दीपाली बाळाराम सकपाळ, रोहन राजेंद्र राजपूरकर, कुलदीप ईश्वर विंचुरा, अमर जयवंत कोडेरा यांनी संगनमत करून, प्रथमेश दिलीप काकडे व अजित रामचंद्र घोडके यांना दीपक नरे हा तोतया माणूस आहे हे माहीत असताना देखील, त्यास ओळखतो म्हणून दस्तावर सही केली.