दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:44 AM2020-03-05T05:44:02+5:302020-03-05T05:44:04+5:30

अंधेरीच्या सहार परिसरात ही कारवाई करण्यात आली असून स्वामी नाथी (५२) आणि सतय्या नाथी (४२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Milk gangster detained | दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

Next

मुंबई : दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री करणाºया टोळीला बुधवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने अटक केली. अंधेरीच्या सहार परिसरात ही कारवाई करण्यात आली असून स्वामी नाथी (५२) आणि सतय्या नाथी (४२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सहार गावच्या तेलगू चाळीत दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कक्ष १०चे पोलीस हवालदार रवींद्र माने यांना मिळाली. त्यानुसार कक्षाचे प्रमुख अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने चाळीत छापा मारला. तेव्हा नंदिनी आणि अमुल या ब्रॅण्डेड दुधाच्या पिशवीतील दूध सिरिंजने काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळून पिशव्या बंद करून विक्रीसाठी पाठवत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवून नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून दोघांन अटक करण्यात आली.

Web Title: Milk gangster detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.