Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूध २ रुपयांनी महागले! 'या' संस्थांनी दुधाचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:45 IST

महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघाने गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे...

मुंबई : अमूल आणि मदर डेअरी दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाची दर वाढ करून २४ तास झाले नाहीत. तोच शुक्रवारी सरकारी दूध संघाच्या २२ संघटनांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. गोकुळ, चितळे, कात्रज, थोटे, पूर्ती, सोनई या दूध संस्थांनी दुधाचे दर वाढले आहेत.

महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघाने गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी यासंदर्भात राज्यातील २२ प्रमुख खासगी आणि सहकारी दूध संघांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दूध खरेदीचे दर, दूध पिशवी पॅकिंग आणि वाहतूक खर्च वाढला आहे. राज्याच्या बाजारपेठेत बिगर राज्य दूध संघांची विक्री वाढत आहे. त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी दुधाच्या किरकोळ दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :दूधमुंबई