राज्यात दूध भेसळ सुरूच!

By Admin | Updated: May 28, 2015 01:42 IST2015-05-28T01:42:05+5:302015-05-28T01:42:05+5:30

राज्यात दूध भेसळ अजूनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी विशेष मोहीम हाती घेऊन राज्यभरातील भेसळ शोधून काढली.

Milk adulteration continues in the state! | राज्यात दूध भेसळ सुरूच!

राज्यात दूध भेसळ सुरूच!

एफडीएची कारवाई
मुंबई : राज्यात दूध भेसळ अजूनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी विशेष मोहीम हाती घेऊन राज्यभरातील भेसळ शोधून काढली. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेली भेसळ अजूनही खुलेआम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधीही राज्य शासनाने दूध भेसळ रोखणे अशक्य असल्याची ग्वाही प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली होती.
अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी खास यासाठी बैठक घेतली होती. त्यात कारवाई करण्याचे निश्चित झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी १६ टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीमने रात्रभर कारवाईचा धडाका लावला व या ठिकाणांहून भेसळ दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
दूध भेसळ हा प्रकार काही नवीन नाही. याआधीही राज्य शासनाने दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी जनतेला खास संदेशही दिला होता.

मालाड येथील पठाणवाडी झोपडपट्टीत नामांकित दूध पिशव्यांचे टँपरिंग करून भेसळ सुरू होती. भेसळ करताना पंडू. एन. वित्या याला रंगेहाथ पकडले. ७ हजार ४८६ रुपयांचा १९७ लीटरचा साठा येथून जप्त करण्यात आला.

Web Title: Milk adulteration continues in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.