कांगा नॉकआउट संघांना मिलींद नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 30, 2023 18:41 IST2023-04-30T18:38:52+5:302023-04-30T18:41:43+5:30
कांगा क्रिकेट स्पर्धेने मुंबई संघाला आणि देशाला चांगले खेळाडू दिले.

कांगा नॉकआउट संघांना मिलींद नार्वेकर यांनी दिल्या शुभेच्छा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-कांगा क्रिकेट स्पर्धेने मुंबई संघाला आणि देशाला चांगले खेळाडू दिले.तीच परंपरा पुढे चालू राहण्यासाठी शिवसेना सचिव( उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अँपेक्स परिषद सदस्य मिलींद नार्वेकर यांनी पुढाकार घेतला आहे. कांगा नॉकआउट संघांच्या स्पर्धांचे त्यांनी आयोजन केले. आज मुंबईतील 133 क्लबच्या या स्पर्धेत सहभागी होवून खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. आज संडे मॉर्निंग अतिशय उत्साहवर्धक अशा क्रिकेटमय वातावरणात झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतला दिली.
कांगा नॉकआउट टूर्नामेंट 2023 ची झलक बघण्यासाठी आज सकाळी 9 ते 12 दरम्यान मुंबईत विविध आठ ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धांना त्यांनी भेटी देवून खेळाडूंचा हुरूप वाढवला. यावेळी परिषद सदस्य निलेश भोसले आणि दत्ता मिठबावकर उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"