Join us  

मिलिंद देवरा, संजय निरूपम यांनी फिरविली शपथविधीकडे पाठ  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:47 AM

महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेसचे दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या दोघा दिग्गजांनी सोहळ्यास पाठ फिरविली.

- गौरीशंकर घाळेमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेसचे दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. मात्र, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या दोघा दिग्गजांनी सोहळ्यास पाठ फिरविली. माजी मंत्री मिलिंद देवरा आणि संजय निरूपम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला गैरहजर राहिल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शविला होता.शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासातील नेते अहमद पटेल, काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल, प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी या दिल्लीतील राजकारण पाहणाऱ्या दिग्गजांनी हजेरी लावली, तर राज्यातील नेतेही हजर होते. मात्र, मिलिंद देवरा आणि संजय निरूपम शपथविधी सोहळ्याकडे फिरकले नाहीत. मिलिंद देवरा हे गुरुवारी मुंबईबाहेर होते. शुक्रवारी सकाळी ते मुंबईत परतल्याची माहिती देवरा यांच्या कार्यालयाने दिली, तर निरुपम मित्राच्या लग्नसोहळ्यास गोव्यात होते. लग्न सोहळ्याचे फोटो त्यांनी टिष्ट्वटरवर टाकले आहेत.शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहिले असले, तरी देवरा आणि निरूपम यांनी टिष्ट्वटरद्वारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ‘महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड झाल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांचे अभिनंदन. अतिशय संवेदनशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून मी त्यांना ओळखतो. आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी आणि यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे,’ असे टिष्ट्वट करताना उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाºया सहा मंत्र्यांनाही मिलिंद देवरा यांनी शुभेच्छा दिल्या. तर, ‘मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा हाती घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन व मंत्रिपदाची शपथ घेणाºया सर्व सहा मंत्र्यांना शुभेच्छा’, असे टिष्ट्वट संजय निरूपम यांनी केले. मात्र, या दोघांनीही सोहळ्याकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आघाडी करण्यास दोन्ही नेत्यांचा विरोधया दोन्ही नेत्यांनी शिवेसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शविला होता. शिवसेनेसोबतची आघाडी काँग्रेससाठी अनर्थकारी ठरेल, असा दावा निरूपम यांनी केला होता, तर काँग्रेस, राष्ट्रवादीने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावी, त्याला शिवसेनेने बाहेरून पाठिंबा द्यावा. मात्र, हे करताना काँग्रेसने आपल्या मूल्यांशी, विचारधारेशी तडजोड करू नये, असे आवाहन देवरा यांनी केले होते.

टॅग्स :काँग्रेसराजकारण