मालवाहतूक वाहनांना मध्यरात्रीपासून टोल माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:22 PM2020-03-29T18:22:52+5:302020-03-29T18:22:52+5:30

कोरोनाच्या पाश्वभूमीवर रविवारी मध्यरात्री पासून मालवाहतूक वाहनाना टोल माफ करण्यात आला आहे .

Midnight toll waiver for freight vehicles | मालवाहतूक वाहनांना मध्यरात्रीपासून टोल माफ

मालवाहतूक वाहनांना मध्यरात्रीपासून टोल माफ

Next

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवर असलेल्या टोल नाक्यांवर माल वाहतूक (good tronsport) करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून टोल बंद करण्यात येत आहे. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने चाबाबतची अधिसूचना आज जारी केली. त्यानुसार, या टोल वसुलीस दिनांक 29 मार्च 2020 मध्यरात्री 12 वाजल्यापासून स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

Web Title: Midnight toll waiver for freight vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.