कर्जतमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण
By Admin | Updated: August 16, 2014 00:53 IST2014-08-16T00:53:51+5:302014-08-16T00:53:51+5:30
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघातर्फे १४ आॅगस्टच्या मध्यरात्री म्हणजे बारा वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले

कर्जतमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण
कर्जत : कर्जत तालुका मराठी पत्रकार संघातर्फे १४ आॅगस्टच्या मध्यरात्री म्हणजे बारा वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाचे हे ११ वे वर्ष आहे.
येथील स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चौकात १४ आॅगस्टच्या मध्यरात्री म्हणजे बारा वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी अध्यक्ष सुनिल दांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बारा वाजून दोन मिनिटांनी कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शहरातील सर्वच पत्रकार उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा मुद्रे येथे नगरसेवक संतोष पाटील, कर्जत नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष राजेश लाड, इंग्लीश मिडियम स्कुलमध्ये संस्थेचे अध्यक्ष झुलकरनैन डाभिया, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रविन्द्र देशमुख, कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. मधुकर लेंगरे, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, तहसील कार्यालयात तहसिलदार रविंद्र बाविस्कर, उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी राजेंद्र बोरकर, माथेरान नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष दिव्या डोईफोडे, नेरळ ग्रामपंचायती मध्ये सरपंच भगवान चंचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तालुक्यातील विविध शाळा, ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.