गृहकर्जासाठी म्हाडाचे प्रयत्न

By Admin | Updated: July 7, 2015 03:10 IST2015-07-07T03:10:24+5:302015-07-07T03:10:24+5:30

म्हाडाच्या लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना सहज गृहकर्ज उपलब्ध व्हावे यासाठी म्हाडा प्रयत्न करणार आहे.

MHADA's effort for home loan | गृहकर्जासाठी म्हाडाचे प्रयत्न

गृहकर्जासाठी म्हाडाचे प्रयत्न


मुंबई : म्हाडाच्या लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना सहज गृहकर्ज उपलब्ध व्हावे यासाठी म्हाडा प्रयत्न करणार आहे. लॉटरी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या बँकेनेच विजेत्यांना गृहकर्ज द्यावे, यासाठी म्हाडा बँकांशी बोलणी करणार आहे.
म्हाडाच्या विभागीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाने एका बँकेची नियुक्ती केली होती. या बँकेमार्फतच विजेत्यांना गृहकर्ज देण्यात येत आहे. याच धर्तीवर लॉटरीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विजेत्यांना घर तारण ठेऊन गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी
म्हाडा अधिकारी प्रयत्न करणार आहेत. घर मिळाल्यानंतर विजेत्यांना गृहकर्जासाठी अडथळे येतात. यावर तोडगा काढण्यासाठी म्हाडा विजेत्यांसाठी धावून येणार आहे. म्हाडा अधिकाऱ्यांची बँकांबरोबर बोलणी यशस्वी झाल्यास म्हाडा लॉटरीत घर मिळणाऱ्या विजेत्यांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: MHADA's effort for home loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.