म्हाडा करणार ऑनलाइन भाडेवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:31 AM2019-12-24T03:31:03+5:302019-12-24T03:31:32+5:30

आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने भाडेवसुली करण्यावर म्हाडाच्या

MHADA will rent online from house | म्हाडा करणार ऑनलाइन भाडेवसुली

म्हाडा करणार ऑनलाइन भाडेवसुली

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेवसुलीचा प्रश्न गंभीर होत असल्याने म्हाडानेमुंबईतील सर्वच संक्रमण शिबिरांतील भाडेवसुलीची मोहीम सुरू केली असून रहिवाशांना विश्वासात घेण्यापासून ते काही ठिकाणी आॅनलाइनसारख्या पर्यायामधून भाडेवसुलीवर भर दिला जात आहे. यासाठी शिबिरांमध्ये जनजागृतीचाही मार्ग अवलंबला आहे. याची माहिती जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरातीचे अनेक पर्याय वापरण्यात येणार आहेत.

आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने भाडेवसुली करण्यावर म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने भर दिला आहे. या उद्देशाने सध्या २० शिबिरांकडे सुविधा पुरविली जाणार असल्याचे म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या केंद्रावर संगणक, इंटरनेट जोडणी आदी गोष्टी पुरविल्यावर आॅनलाइन यंत्रणेच्या मदतीतून भाडे स्वीकारले जाणार आहे. या भाडे वसुलीसाठी पहिल्यांदा सर्व रहिवाशांपर्यंत माहिती पुरविण्याचे काम करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही भाड्याची रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. म्हाडाच्या अंतर्गत येणाºया सर्वच संक्रमण शिबिरांतील भाडेकरूंकडून या आर्थिक वर्षांची १४५ कोटी रुपयांच्या भाडेवसुलीचे उद्देश ठरविले आहे.
म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या ताब्यात आपत्कालीन व्यवस्था म्हणून संक्रमण शिबिरांचे गाळे आहेत. साधारणत: जुन्या, पडीक चाळी-इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात घरे दिली जातात. सध्या या शिबिरांतील कुटुंबांची संख्या सुमारे २२ हजारांपर्यंत आहे. म्हाडाच्या नोंदीनुसार घुसखोरांची संख्या साडेआठ हजार आहे, असे सांगण्यात येते.
तत्कालीन युती सरकारने घुसखोरांना अधिकृत दर्जा दिल्याने आता भाडेवसुलीचा मुद्दा प्रमुख ठरला आहे. या सर्व शिबिरांतील मासिक भाडेवसुली योग्य पद्धतीने होण्यासाठी म्हाडाने आॅनलाइनचा पर्याय स्वीकारला आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सायन-प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरात आॅनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात आला. यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने म्हाडाचा उत्साह
वाढला आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या सर्व संक्रमण शिबिरांत आॅनलाइन पद्धतीने भाडेवसुली केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.

Web Title: MHADA will rent online from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.