पुनर्विकासाबाबत म्हाडा उपाध्यक्षांना धरले धारेवर
By Admin | Updated: May 13, 2014 05:25 IST2014-05-13T05:25:43+5:302014-05-13T05:25:43+5:30
सुमारे १५ वर्षांपासून रखडलेल्या कांदिवली समतानगरातील वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक रहिवाशांनी सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांना धारेवर धरले.

पुनर्विकासाबाबत म्हाडा उपाध्यक्षांना धरले धारेवर
मुंबई : सुमारे १५ वर्षांपासून रखडलेल्या कांदिवली समतानगरातील वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक रहिवाशांनी सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांना धारेवर धरले. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत ठराव नसताना व नियमबाह्य पद्धतीने सोसायटीच्या पुनर्विकासासाठी मंजुरी देण्यात आलेल्या कामापासून चौकशी अहवालाला मिळालेल्या स्थगितीबाबत रोष व्यक्त केला. स्थानिक भागामध्ये लवकरच जनसुनावणी घेण्याचे आश्वासन गवई यांनी शिष्टमंडळाला दिले. समतानगरातील सुमारे २२ एकर जागेतील ८० वसाहतींचे पुनर्वसन रखडल्यामुळे सुमारे ३ हजारावर भाडेकरूंना गैरसोयी व दुरवस्थेला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये विविध निमशासकीय ६ सोसायटीचा समावेश आहे. त्यांची संमती न घेताच आणि ५१ हजार चौरसमीटर जागेला मंजुरी मिळाली असताना म्हाडाने २ लाख १३ हजार ५७० चौरसमीटर जागेच्या लेआऊटला परवानगी दिली आहे. पुनर्विकासाला मंजुरी दिलेल्या ४९ पैकी ३१ सोसायट्यांचे ठराव नसल्याचे म्हाडाच्या चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे. या ठिकाणी एकूण १६० इमारती आहेत. त्यापैकी काही घरांची अवस्था वाईट असल्याने ११०५ भाडेकरूंनी स्थलांतर केले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहाण्यासाठी मिळण्यासाठी योग्य बाबीची पूर्तता करून कार्यवाही करण्यात यावी. रहिवासी व मूळ भाडेकरूंच्या प्रश्नाबाबत जाहीर सभा घेऊन सोडवूूणक करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार निवारण समिती स्थापन्याचे गवई यांनी मान्य केले. या मंचमध्ये स्थानिक रहिवासी, सोसायटी भाडेकरूंचे प्रतिनिधी, विकासक, महापालिका, म्हाडा व नगरविकास विभागील अधिकार्यांचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)