म्हाडाची पोस्ट लॉटरी नव्या वर्षात
By Admin | Updated: December 25, 2014 01:37 IST2014-12-25T01:37:32+5:302014-12-25T01:37:32+5:30
शासकीय काम आणि सहा महिने थांब, या म्हणीचा प्रत्यय म्हाडाच्या घरांच्या सोडत विजेत्या नागरिकांना येत आहे.

म्हाडाची पोस्ट लॉटरी नव्या वर्षात
मुंबई : शासकीय काम आणि सहा महिने थांब, या म्हणीचा प्रत्यय म्हाडाच्या घरांच्या सोडत विजेत्या नागरिकांना येत आहे. अर्ज पात्रता छाननीसाठीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी अद्याप ‘मुहूर्त’ मिळेनासा झाला आहे. त्यासाठी बनविलेल्या ‘लॉटरी पश्चात सॉफ्टवेअर’मध्ये काही त्रुटी असल्याने ती कार्यान्वित करण्याऐवजी लांबणीवर टाकण्यात आली.
म्हाडाने २२ डिसेंबरपासून पोस्ट लॉटरी प्रक्रिया सुरु करण्याचे जाहीर केले होते. मात्र आता त्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
गेल्या जूनमध्ये मुंबई मंडळाकडून ८१४ सदनिकाची सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये विजेत्या ठरलेल्या अर्जाची छाननी व पात्रताबाबत त्यांच्याशी व्यवहार राबविण्यात येणार असून ँँँँ३३स्र://स्रङ्म२३’ङ्म३३ी१८.ेँंंि.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर ‘लॉग इन’ करुन त्याबाबतची यादी व कागदपत्राच्या प्रती द्यावयाच्या आहेत. याबाबत अॅक्सिस बॅँकेशी व्यवहार करावयाचा असून लॉटरीत विजेत्यांना लवकरच पत्रे पाठवून माहिती दिली जाणार आहे.
महानगरात घरांची वाढती मागणी आणि त्याचा तुटवड्यामुळे गरजू नागरिक म्हाडाच्या यावर्षीच्या लॉटरीकडे आस लावून बसले होते. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे २०१४ मधील लॉटरीचे वेळापत्रक वारंवार बदलण्यात आले होते. अखेर २५ जूनला मुंबई व कोकण विभागातील २६४१ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. मात्र या घरांचे काम अपूर्णावस्थेत असल्याने म्हाडाने त्यानंतरची प्रक्रिया संथगतीने घेण्याचे ठरविले होते. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबई मंडळांने केवळ विजेत्यांना अभिनंदनाचे पत्र पाठविण्याची औपचारिकता दाखविली होती. तर कोकण मंडळाला तितकेही औचित्य दाखविलेले नाही. त्यांच्या विरार व बोळींज येथील १८२७ घरांचे काम अद्याप अर्धवट असल्याने त्याबाबत विजेत्यांच्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पुढील वर्षाच्या मार्चपासून करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी म्हणजे ३१ मे २०१३ रोजी मुंबईतील १२४४ घरांची ‘पोस्ट लॉटरी’ प्रक्रिया रेंगाळलेली आहे. अर्जाच्या छाननीचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. यावेळी काढलेल्या सोडतीतील ८० टकके घरांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, हे विशेष ! (प्रतिनिधी)