म्हाडाचे पदाधिकारी मैदानात
By Admin | Updated: October 4, 2014 01:24 IST2014-10-04T01:24:27+5:302014-10-04T01:24:27+5:30
राजकारणात अनुभवागणिक वरचे पद मिळविण्याची प्रत्येक नेत्याची इच्छा असते, त्याच न्यायाने प्राधिकरण, महामंडळावर कार्यरत असलेल्या सहा पदाधिका:यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.

म्हाडाचे पदाधिकारी मैदानात
>जमीर काझी ल्ल मुंबई
राजकारणात अनुभवागणिक वरचे पद मिळविण्याची प्रत्येक नेत्याची इच्छा असते, त्याच न्यायाने प्राधिकरण, महामंडळावर कार्यरत असलेल्या सहा पदाधिका:यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. कॉँग्रेस आघाडी फुटल्याने त्यांची सुप्त इच्छा प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळाली असून पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात बाशिंग बांधून उभे आहेत.
म्हाडाचे मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी, कोकण मंडळाचे सभापती माणिक जगताप, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे प्रसाद लाड तर महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र राणो, सदस्य प्रवीण नाईक हे निवडणूक लढवीत आहेत, अब्राहनी, जगताप व श्रीमती शहा या कॉँग्रेसच्या तर उर्वरित तिघे जण राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, युसूफ अब्राहनी व माणिक जगताप यांनी यापूर्वी आमदारकीची एक टर्म पूर्ण केली आहे. दुस:यांदा तिकीट न मिळाल्याने ते म्हाडातील पदासाठी 4 वर्षापासून प्रय}शील होते. अब्राहनी यांना लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तर जगताप यांची विधानसभेला पंधरवडय़ाचा अवधी बाकी असताना नियुक्ती करण्यात आली. युसूफ अब्राहनी हे शिवाजीनगर -मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून तेथील विद्यमान आ. अबू आझमी यांनी कॉँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटच्या क्षणार्पयत प्रय} केले होते. मुख्यमंत्र्यांनी सपाबरोबर आघाडी जाहीर केल्यानंतर अब्राहनी यांनी थेट ‘1क् जनपथ’शी संपर्क साधून आघाडी मोडून तिकीट मिळविण्यात यश मिळविले आहे.
कोकण मंडळाचे माणिक जगताप यांना आघाडी मोडल्याने राष्ट्रवादीच्या कोटय़ातील महाड मतदारसंघामधून आपसूकच दुस:यांदा नशीब अजमाविण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या उदय अबोणकर यांच्याशी सामना होत आहे. आरआर बोर्डाचे सभापती प्रसाद लाड सायन कोळीवाडय़ातून राष्ट्रवादीचे उमेदवार असून कॉँग्रेसचे आ. जगनाथ शेट्टी यांच्याशी लढत होत आहे.
म्हाडाच्या पदाधिका:यांबरोबर म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीत कार्यालय असलेल्या महिला अयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा या कॉँग्रेसच्या तिकिटावर मलबार हिलमधून रिंगणात आहेत. भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणा:या या मतदारसंघात आ.मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्धच्या मतदाराच्या नाराजीचा त्यांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तविली जात असताना याच ठिकाणाहून राष्ट्रवादीने सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणो यांना उमेदवारी दिली आहे.
राणोंची न्यासाच्या अध्यक्षपदी महिन्याभरापूर्वी निवड झालेली असून या ठिकाणी 7 वर्षापासून विश्वस्त असलेल्या प्रवीण नाईक यांना कॉँग्रेसने माहीम मतदारसंघातून तिकीट दिले आहे. मनसे आ. नितीन सरदेसाई व गेल्या वेळी कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या सेनेच्या सदा सरवणकर यांच्याशी त्यांची जोरदार लढत होणार आहे.
च्म्हाडाची विविध 3 मंडळे, सिद्धिविनायक मंदिर न्यास व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विविध विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस स्वतंत्रपणो निवडणूक लढवीत असल्याने त्यांना तिकिटाची लॉटरी लागली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी किती जण त्यामध्ये यशस्वी होतात, हे 19 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.
च्राजकारणात अनेक वर्षे काम केल्यानंतर आमदार, खासदारकीला संधी मिळण्यापूर्वी किमान एखाद्या महामंडळ, आयोगावर वर्णी लागावी, यासाठी राजकीय कार्यकत्र्याकडून जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जाते, त्यानुसार आघाडी सरकारमध्ये कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोटय़ातून अशासकीय पद मिळविलेल्या या नेत्यांना आता विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचे वेध लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.