Join us  

लवकरच म्हाडाची लॉटरी; जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 7:42 PM

येत्या एक ते दोन महिन्यात म्हाडाची लॉटरी

मुंबई: येत्या एक दोन महिन्यांमध्ये म्हाडाकडूनमुंबईतीलघरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे. म्हाडाच्या मागील लॉटरीत मुंबईतील घरांची संख्या अतिशय कमी होती. या लॉटरीतील बहुतांश घरं विरार भागातील होती. त्यामुळे या लॉटरीला फारसा प्रतिसाद लाभला नाही. मात्र म्हाडाच्या पुढील लॉटरीत मुंबईतील घरांचा समावेश आहे. याबद्दलची आकडेवारी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱ्यांना मोठा दिलासाम्हाडाची पुढील सोडत येत्या एक ते दोन महिन्यात काढली जाऊ शकते. यातील बहुतांश घरं मुंबईतील आहेत. म्हाडाची पुढची सोडत 1194 काढण्यात येईल. यामध्ये सर्वाधिक घरं वडाळ्यातील अँटॉप हिलमध्ये आहेत. एकूण घरांपैकी 278 घरं अँटॉप हिलमधील आहेत. यानंतर मुलुंडमधील गव्हाणपाडा भागात 269 घरं आहेत. याशिवाय महावीर नगरमध्ये 170 घरं आहेत. मुंबईत किती, कुठे घरं असणार?अँटॉप हिल- 278गव्हाणपाडा- 269महावीर नगर- 170प्रतीक्षानगर, सायन- 88पी. एम. जी. पी., मानखुर्द- 114पंतनगर- 2टोगोर नगर, आम्रपाली- 7पंतनगर OB-1- 2सहकार नगर- 8सिद्धार्थ नगर, गोरेगाव- 24बदानी बोरी चाळ, परळ- 68तुंगा पवई (2013)- 65तुंगा पवई (2014)- 2तुंगा पवई (2016)- 26मानखुर्द बि. नं. 01- 1मानखुर्द बि. नं. 03- 1मानखुर्द (2017)- 2चांदिवली (2017) 1गायकवाड नगर, मालवणी मालाड (2015)- 1ओ. बी. 8 सिद्धार्थ नगर, गोरेगाव- 1लोअर परेल (2017)- 27शिंपोली, कांदिवली (2011)- 4शैलेंद्र नगर, दहिसर (2016)- 1शिंपोली, कांदिवली प. (2016)- 1मागाठाणे, बोरिवली (2016)- 1गोराई रोड, बोरिवली प. - 1मागाठाणे, बोरिवली (2013)- 1

टॅग्स :म्हाडामुंबईघर