मुंबई : म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. विकासकांकडून प्राप्त ही घरे 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडातर्फे घरांचा ताबा देण्यापूर्वी त्याची डागडुजी, दुरुस्ती करून दिली जाईल. घरांचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे भरून ताबा दिला जाणार आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
विक्रीसाठी वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सोमवारी 'गो लाइव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला. यावेळी संजीव जयस्वाल बोलत होते. लॉटरीच्या कालावधी दरम्यान अनेक त्रयस्थांकडून घर मिळवून देतो, अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटच्या व अॅपच्या माध्यमातूनच लॉटरीत सहभाग घ्यावा. या प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर घराच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी पूर्णतः ऑनलाइन असल्याने अर्जदारांना म्हाडा कार्यालयात यावे लागणार नाही, असेही संजीत जयस्वाल यांनी सांगितले.
एकूण २७ विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश असून, या सर्व ठिकाणांची गूगल लोकेशन माहिती वेबसाईट व मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांना अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छित घरांची पाहणी करता यावी, यासाठी संबंधित संपर्क कर्मचारी व त्यांचे संपर्क क्रमांकही वेबसाईट व अॅपवर २ ते ३ दिवसांत उपलब्ध होतील.
ज्यांनी यापूर्वी सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असून, कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करून नोंदणी केली आहे, अशा अर्जदारांनी प्रोफाइलमध्ये बदलांच्या नोंदी अद्ययावत कराव्यात. मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ
Web Summary : MHADA will pay outstanding property tax and maintenance for lottery homes before handing over possession. Prices are as per existing policy. Online registration for the lottery has begun, with all processes fully online. Location information for housing projects will be on MHADA's website and app.
Web Summary : एमएचएडीए लॉटरी घरों पर कब्जा देने से पहले बकाया संपत्ति कर और रखरखाव का भुगतान करेगा। कीमतें मौजूदा नीति के अनुसार हैं। लॉटरी के लिए ऑनलाइन पंजीकरण शुरू हो गया है, सभी प्रक्रियाएं पूरी तरह से ऑनलाइन हैं। आवास परियोजनाओं की स्थान संबंधी जानकारी एमएचएडीए की वेबसाइट और ऐप पर होगी।