Join us  

खूशखबर ! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 4:46 AM

MHADA Home News : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे, असे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 मुंबई :  म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे, असे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. म्हाडाकडे जमीन नाही. विकासकांसोबत संयुक्त भागीदार करून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,  जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलब्ध केली जातील.  म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास  यश आलेले नाही, ही खंतदेखील आव्हाड यांनी व्यक्त केली.

टॅग्स :म्हाडामुंबईघर