लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपुर शिवारात असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील ४०२ घरे आगाऊ अंशदान (ऍडव्हान्स कंट्रीब्यूशन) तत्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. या घरांच्या किंमती १४ लाख ९४ हजार २३ रुपये ते ३६ लाख ७५ हजार २३ रुपये दरम्यान आहेत.
वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात लॉटरीसाठीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृतीला सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. जयस्वाल यांनी सांगितले की, २०२५ मध्ये नाशिक मंडळाने या लॉटरीपूर्वी तीन लॉटरीद्वारे ८४६ घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. २०२५ मध्ये आयोजित ही चौथी लॉटरी असून परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आगाऊ अंशदान म्हणजे ज्या घरांची लॉटरी काढली जात आहे, ती घरे अद्याप बांधण्यात आलेली नाहीत. लॉटरीत विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना घरांची विक्री किंमत पाच टप्प्यांमध्ये भरता येणार आहे. जेणेकरून विजेत्या अर्जदारावर घराच्या विक्री किंमतीचा ताण येणार नाही. तर घरांना खरेच मागणी आहे की नाही ? हे सुद्धा म्हाडाला या लाटरीच्या निमित्ताने कळणार असून, भविष्यात त्या प्रमाणे नियोजन करता येणार आहे.लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात १३८ घरे, पाथर्डी शिवारात ३०, मखमलाबाद शिवारात ४८, आडगाव शिवारातील ७७ अशा एकूण २९३ घरांचा लॉटरीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात ४०, पाथर्डी शिवारात ३५, आडगाव शिवारात ३४ अशी एकूण १०९ घरे विक्रीसाठी आहेत. अर्जदारास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल. - २३ डिसेंबरच्या रात्री ११.५९ पर्यंत नोंदणी व अर्ज सादर करण्याची मुदत आहे.- २३ डिसेंबरच्या रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येईल. - २४ डिसेंबर रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. - ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. - ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ पासून ते २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर आक्षेप/दावे-हरकती दाखल करता येतील. - ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दावे-हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्धी होईल. - लॉटरीची दिनांक, वेळ व स्थळ स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल.
Web Summary : MHADA Nashik is offering 402 homes in various projects via lottery. Prices range from ₹14.94 to ₹36.75 lakhs. Registration starts Monday for homes yet to be built, with payments in installments. This lottery helps gauge demand for future planning.
Web Summary : म्हाडा नाशिक लॉटरी के माध्यम से विभिन्न परियोजनाओं में 402 घर दे रहा है। कीमतें ₹14.94 लाख से ₹36.75 लाख तक हैं। पंजीकरण सोमवार से शुरू होता है। किश्तों में भुगतान के साथ, यह लॉटरी भविष्य की योजना के लिए मांग का आकलन करने में मदद करती है।