म्हाडा सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:07 IST2021-09-23T04:07:22+5:302021-09-23T04:07:22+5:30

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले ...

MHADA announces revised draw schedule | म्हाडा सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

म्हाडा सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांसाठी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार इच्छुक पात्र अर्जदारांना संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी २९ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना ३० सप्टेंबर रात्री १२ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अनामत रकमेचा भरणा १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली. संगणकीय सोडतीचा कार्यक्रम १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.

Web Title: MHADA announces revised draw schedule