मेट्रोचा मेगाब्लॉक सुरळीत!

By Admin | Updated: January 25, 2015 01:13 IST2015-01-25T01:13:18+5:302015-01-25T01:13:18+5:30

तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर शनिवारी सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० वाजेदरम्यान घेण्यात आलेला मेगाब्लॉक सुरळीत पार पडला.

Metro's megablock is smooth | मेट्रोचा मेगाब्लॉक सुरळीत!

मेट्रोचा मेगाब्लॉक सुरळीत!

मुंबई : काही महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर शनिवारी सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० वाजेदरम्यान घेण्यात आलेला मेगाब्लॉक सुरळीत पार पडला. चौथा शनिवार आणि मेगा ब्लॉकबाबत पूर्वकल्पना असल्याने या कालावधीत मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची संख्या अत्यल्प होती़ त्यामुळे फारसा परिणाम जाणवला नाही. साडेसात वाजल्यानंतर नियोजनाप्रमाणे मेट्रो सुरू राहिल्याने प्रवाशांना जास्त काळ तिष्टत थांबावे लागले नाही. (प्रतिनिधी)

च्मेट्रोच्या मेन्टेनन्ससाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचे कारण मेट्रो प्रशासनाने पुढे केले आहे. तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असा तीन दिवस सकाळच्या सत्रात हा मेगाब्लॉक सुरू राहणार असून, आजचा दिवस सुखरूप पार पडला. उद्या आणि प्रजासत्ताक दिनीही पहाटे दोन तास मेगाब्लॉक घेतला जाईल. २७ जानेवारीपासून मेट्रो पुन्हा नियोजित वेळेनुसार मुंबईकर चाकरमान्यांच्या सेवेत दाखल होईज़ सध्या घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान मेट्रोची सेवा पूर्णपणे खंडित ठेवण्यात येत आहे.

Web Title: Metro's megablock is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.