मेट्रोची दरवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री
By Admin | Updated: January 10, 2015 02:20 IST2015-01-10T02:20:35+5:302015-01-10T02:20:35+5:30
मुंबई मेट्रोची दरवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रोकडून ९ जानेवारीपासून त्वरित दरवाढ लागू करण्यात आली.

मेट्रोची दरवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री
मुंबई : मुंबई मेट्रोची दरवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रोकडून ९ जानेवारीपासून त्वरित दरवाढ लागू करण्यात आली. ही दरवाढ जास्तच असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. यामध्ये घाटकोपर ते वर्सोवा टोकनवरील प्रवासासाठी ४0 रुपये आणि स्मार्टकार्डसाठी ३२ रुपये मोजावे लागणार आहेत.
८ जूनपासून घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो रेल्वे सुरू झाली. ही सेवा सुरू होताच प्रथम सरसकट १० रुपये दर ठरवण्यात आले आणि त्याचा फायदा प्रवाशांनी घेतला. मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत असल्याने कालांतराने १0, १५ आणि २0 रुपये या टप्प्यात भाडे आकारणी केली जाऊ लागली. प्रवास अधिक सुलभ होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करीत प्रवाशांनी प्रवास करणेच पसंत केले. मात्र या दरामुळे दररोज तब्बल ८५ लाख रुपयांचे नुकसान मेट्रोला सोसावे लागत होते. (प्रतिनिधी)
नवीन दर तत्काळ लागू
भाडेवाढीची रिलायन्स इन्फ्राकडून करण्यात आलेली मागणी न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली होती. तसचे दरवाढीविरोधातील एमएमआरडीएचे अपील फेटाळण्यात आले होते. त्यानंतर मुंबई मेट्रोकडून त्वरित दरवाढ लागू करण्यात आली आणि याचा फटका प्रवाशांना बसू लागला.
टोकनस्मार्ट कार्ड
घाटकोपर ते वर्सोवा, डी.एन. नगर आणि आझादनगरपर्यंत ४0 रु.३२ रु
घाटकोपर ते अंधेरी, वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे आणि चकालापर्यंत३0 रु.२७ रु
घाटकोपर ते एअरपोर्ट, मरोळनाका, साकीनाकापर्यंत२0 रु.१८ रु
घाटकोपर ते असल्फा, जागृतीनगरपर्यंत१0 रु.१० रु