Join us  

मेट्रो-तीनचे काम वेगात; एमआयडीसी स्थानकाचे भुयारीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 6:17 AM

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो -तीन मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या मार्गिकेतील एमआयडीसी स्थानकाच्या भुयारीकरणाचे ...

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या मार्गिकेतील एमआयडीसी स्थानकाच्या भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) पूर्ण करण्यात आले आहे. एमआयडीसी स्थानक हे पहिलेक स्थानक आहे ज्याच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे स्थानक जमिनीपासून २० मीटर खाली असणार असून २४० मीटर लांब आणि २१ मीटर रूंद आहे.एमएमआरसीने वेगाने काम हाती घेतले आहे. त्यानुसार एमआयडीसी स्थानकाच्या स्लॅपचे कामदेखील ८० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. हे स्थानक दोन मजली असेल. शिवाय या स्थानकाचे बांधकाम कट अँड कव्हर या तांत्रिक पद्धतीचा वापर करून करण्यात येत आहे. जिथे भुयारातुन मेट्रो धावणार असून वरच्या जमिनीच्या भागाचा विविध कामांसाठी वापर करण्यात येणार आहे. येथे स्थानकाच्या तळ मजल्यावर मेट्रो थांबण्यासाठी जागा करण्यात येणार आहे.पहिल्या मजल्यावर तिकीट घर आणि सुरक्षेसाठी संबंधीची यंत्रणा असणार आहे. तर, दुसऱ्या मजल्याचा उपयोग व्यवसायीक वापरासाठी करण्यात येणार आहे. स्थानकाकडे सहजतेने पोहचण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.एमआयडीसी स्थानकाचे भुयारीकरण काम पूर्ण झाले असून लवकरच स्थानकाच्या बांधकामाचे कामही सुरू करण्यात येणार आहे. हे स्थानक पॅकेज ७ चा भाग आहे. या भुयारीकरणाच्या कामासाठी वैनगंगा १, २, ३ टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला आहे.पॅकेज ७ अंतर्गत मरोळ नाका, एमआईडीसी आणि सीप्झ ही स्थानके प्रस्तावित आहेत. एमआयडीसी स्थानकाला महाराष्ट्र पासपोर्ट मुख्यालय, उद्योग सारथी भवन, आकृती बिझनेस हब आणि मरोळ डेपो जोडण्यात आले आहे. मुंबईकरांना भेडसावत असलेली वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ३३ हजार कोटी रूपयांचा खर्च सरकारतर्फे करण्यात येत आहे.२०२१ सालापर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस एमएमआरसीमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. २७ स्थानके असलेल्या या मेट्रो-तीन मार्गिकेमध्ये तब्बल २६ स्थानके ही भुमिगत असतील तर, एक स्थानक जमिनीवर बांधण्यात येणार आहे.यांना जोडले जाणार स्थानकमहाराष्ट्र पासपोर्ट मुख्यालयउद्योग सारथी भवनआकृती बिझनेस हब स्थानक२४० मीटर लांब, २१ मीटर रूंद स्थानकजमीनीपासून२० मीटर खाली

टॅग्स :मेट्रो