Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ३ कामाच्या आवाजाची पातळी नोंदविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:28 IST

मेट्रो-३चे काम सुरू असलेल्या तीन ठिकाणांवरील आवाजाच्या पातळीची नोंद केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. त्याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही पुढील कारवाईसंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला.

मुंबई : मेट्रो-३चे काम सुरू असलेल्या तीन ठिकाणांवरील आवाजाच्या पातळीची नोंद केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. त्याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही पुढील कारवाईसंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला.मेट्रो-३च्या कामादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला मेट्रो-३चे काम सुरू असलेल्या चर्चगेट, कफ परेड आणि माहीम या तीन ठिकाणांवरील आवाजाची पातळी मोजण्याचे निर्देश दिले होते. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करणार का, अशी विचारणाही न्यायालयाने राज्य सरकारकडे केली होती.

टॅग्स :मेट्रो