मेट्रो - ३ : भुयारीकरणाचे ९५ टक्के काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST2021-05-28T04:06:16+5:302021-05-28T04:06:16+5:30
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे कामदेखील प्रगतिपथावर आहे. आजघडीला भुयारीकरणाच्या कामाचा विचार करता अप आणि डाऊन ...

मेट्रो - ३ : भुयारीकरणाचे ९५ टक्के काम प्रगतिपथावर
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे कामदेखील प्रगतिपथावर आहे. आजघडीला भुयारीकरणाच्या कामाचा विचार करता अप आणि डाऊन अशा ५४ पैकी ५२ किमीचे म्हणजे ९५ टक्के भुयारीकरण होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो - ३ हा भुयारी प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गाची एकूण लांबी ३२.५ किमी आहे. २७ स्थानके आहेत. प्रकल्प पूर्ण होण्याची सर्वसाधारण मुदत डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ आहे. सध्या कफ परेड, मुंबई सेंट्रल, वरळी येथील काही कामे बाकी आहेत. आता सूर्या आणि तानसा या दोन टनेल बोरिंग मशीन्स काम करत आहेत. बांधकामाचा विचार करता हे काम ७९ टक्के पूर्ण झाले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आता पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पंप, कंट्रोल रूम व तसेच प्रत्येक स्थानकावर आपत्कालीन रिस्पॉन्स टीम, प्रत्येक बांधकाम स्थळावर जेट्टींग मशिन्स आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पर्जन्य जल गटारांची सफाई, त्यातील गाळ काढणे यासह सर्व नाले व आजूबाजूच्या परिसराची सफाई करण्यात आली आहे.