मेट्रो २चे कारशेड चारकोपहून हलविले
By Admin | Updated: July 11, 2015 02:27 IST2015-07-11T02:27:28+5:302015-07-11T02:27:28+5:30
दहिसर-चारकोप-वांद्रे- मानखुर्द या मेट्रो २ प्रकल्पाचे कारशेड चारकोप येथे उभारण्यास अडथळे निर्माण झाल्याने येथील कारशेड पर्यायी जागांमध्ये हलविण्यात आले आहे

मेट्रो २चे कारशेड चारकोपहून हलविले
मुंबई : दहिसर-चारकोप-वांद्रे- मानखुर्द या मेट्रो २ प्रकल्पाचे कारशेड चारकोप येथे उभारण्यास अडथळे निर्माण झाल्याने येथील कारशेड पर्यायी जागांमध्ये हलविण्यात आले आहे. मंडाले, मालवणी आणि दहिसर येथील तीन जागांवर कारशेड उभारण्यात येणार असून, येथील जागा ताब्यात घेण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रयत्न सुरू केले आहेत.
पर्यावरण व वन मंत्रालयाने सीआरझेड क्षेत्रात मेट्रोचे कारशेडव्यतिरिक्त इतर अनुषांगिक बांधकामास परवानगी नाकारली होती. त्यामुळे एमएमआरडीएने पर्यायी जागांचा शोध सुरू केला होता. मालाड मालवणी येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्टजवळील मोकळ्या जागेवर मेट्रो २चे कारशेड बनविण्यात येणार आहे. या जागेवर असलेले आरक्षण उठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दहिसर येथील जमीन एअर पोर्ट प्राधिकरणाची असल्याने ती जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तर मंडाले येथील जागेचा ताबाही महसूल विभागाकडून मिळणार आहे.