आॅटोमॅटिक रेनगेज यंत्रणेने मोजणार पाऊस
By Admin | Updated: May 28, 2014 00:17 IST2014-05-28T00:17:10+5:302014-05-28T00:17:10+5:30
पावसाची आकडेवारी अधिक वास्तवदर्शी होण्यासाठी गतवर्षीपासून राज्यभरातील २०६५ महसूल मंडळात पाऊस मोजण्याची स्वयंचलीत यंत्रणा (अॅटोमॅटीक रेनगेज) यावर्षीही अंमलात
आॅटोमॅटिक रेनगेज यंत्रणेने मोजणार पाऊस
पेण : पावसाची आकडेवारी अधिक वास्तवदर्शी होण्यासाठी गतवर्षीपासून राज्यभरातील २०६५ महसूल मंडळात पाऊस मोजण्याची स्वयंचलीत यंत्रणा (अॅटोमॅटीक रेनगेज) यावर्षीही अंमलात आणून पाऊस मोजण्याची प्रभावी कार्यप्रणाली पेणच्या पाच महसूल मंडळांत ४ धरणक्षेत्रात अंमलात आणली जाणार असल्याचे पेणच्या तहसीलदार सुकेशिनी पगारे यांनी सांगितले. आॅटोमेटीक रेनगेज यंत्रणेमुळे धरणांच्या कुशीत बसलेल्या पेणच्या परिसरातील पावसाची आकडेवारीमुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला त्याचा मोठा फायदा मिळणार आहे. तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात पडलेला पाऊस ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली पाऊस मोजण्याची पद्धत गतवर्षीपासून मोडीत काढण्यात राज्यसरकारच्या महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले होते. गतवर्षीपासून संबंध राज्यातील सर्व अशा २०६५ मंडळांमध्ये महसूल मंडळ अधिकारी व तलाठी वर्गाला स्वयंचलीत यंत्रणेची रेनगेजद्वारे पावसाची आकडेवारी मोजण्याचे व ती पाठविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्यावर्शी मंडळस्तरावर हा पथदर्षी प्रकल्प यशस्वी झाला होता. यावर्षीच्या मान्सून हंगामात पेण शहर मंडळ परिसर व धरणांच्या परिसरातील पावसाचे मोजमाप अधिक पारदर्षी मिळावे यासाठी पेण तहसीलदार सुकेशिनी पगारे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी वर्गाला आॅटोमॅटिक रेनगेजद्वारे पावसाचे मोजमाप घेण्याच्े व तातडीने ते पेण तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. पेणचा परिसर चार नद्या, चार मोठी धरणे व पश्चिम अरबी समुद्राच्या मोठ्या खाड्यांनी वेढलेल्या असल्याने नैसर्गिक आपत्तीकाळात पावसाचे अनुमान, पडणारा पाऊस, पावसाचे प्रमाण, अतिवृष्टीची तीव्रता, यांचे अंदाज व वास्तवस्थिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी चांगली मदत होणार आहे. गतवर्षी कोकण व विदर्भात झालेली अतिवृष्टी, मराठवाडा व खानदेशात पडलेले पावसाचे खंड, याचे तालुकानिहाय आकडेवारीपेक्षा मंडळनिहाय पावसाच्या संकलीत केलेल्या आकडेवारीवरुन अधिक तीव्रतेने स्पष्ट झाले होते. पेण तहसीलदारांनी हीच बाब हेरुन आपत्तीयंत्रणेच्या कामकाजात मंडळनिहाय पाऊस मोजण्याची आॅटोमॅटिक रेनगेज यंत्रणा प्रभावी ठरणार आहे. मंडळस्तरावर पाऊस मोजण्याची मागणी यापूर्वी अनेकवेळा करण्यात आली होती. गेली दोन वर्ष कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर महसूल विभागाचे तत्कालीन सचिव जयंत भाटीया यांनी जिल्हाधिकार्यांना याबाबत सूचना व मार्गदर्शन केले व त्यानुसार गतवर्षीपासून राज्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये आॅटोमेटिक रेनगेज बसविण्यात आले. (वार्ताहर)