प्रेमानंद रूपवते अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 05:28 IST2018-08-06T05:28:28+5:302018-08-06T05:28:31+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या पार्थिवावर रविवारी दादर येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 Merry Revered Merry | प्रेमानंद रूपवते अनंतात विलीन

प्रेमानंद रूपवते अनंतात विलीन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या पार्थिवावर रविवारी दादर येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रूपवते यांचे शनिवारी मुंबईतील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. अंत्यसंस्काराला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार अ‍ॅड. सुधीर तांबे, आनंदराज आंबेडकर, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, अध्यक्ष संजय निरूपम उपस्थित होते. त्याच्या केम्प्स कॉर्नर येथील निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title:  Merry Revered Merry