Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांना दिले मासिक पाळी समुपदेशन; जागतिक योगा दिनानिमित्त अनोखा उपक्रम 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 22, 2023 15:15 IST

१२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-आंतरराष्ट्रीय  योगा दिन काल सर्वत्र साजरा झाला. त्याच अनुषंगाने आदिवासी महिलांचा आरोग्यावर काम करणाऱ्या अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेने अनोखा उपक्रम राबवला.या संस्थेमार्फत गोरेगाव पूर्व आरे येथील केलटी पाडा व वणीचा पाडा येथील आदिवासी महिलांना  मासिक पाळी संदर्भात समुपदेशन केले. तसेच येथील १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

महिलांमध्ये मासिक पाळी बद्दल अवेअरनेस बद्दल माहिती देऊन आरोग्यासाठी सॅनेटरी हायजेनिक पॅड वापरावे जेणेकरून आपण अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो अशी भावना महिलांच्या मनामध्ये रुजवली अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी दिली.

येणाऱ्या पुढील काळामध्ये त्या प्रत्येक आदिवासी महिलेला मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा अभिषेक शैक्षणिक संस्थेचा मानस आहे. या उपक्रमासाठी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत गोसलिया व प्रसिद्ध आर्किटेक्ट आशिष गोसलिया यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

येथील आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी संदर्भात जागृती निर्माण करून  आरोग्यासाठी सॅनेटरी हायजेनिक पॅड वापरावे असे त्यांना आवाहन केले. जेणेकरून आपण अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो अशी भावना महिलांच्या मनामध्ये रुजवली अशी माहिती यावेळी उपस्थित आदिवासी महिला व तरुणींना दिल्याचे त्यांनी दिली.

आदिवासी पाड्यातील महिलांच्या आरोग्यासाठी अनेक कार्यक्रम व  आरोग्य शिबिर राबवते. त्याचप्रमाणे अनेक आदिवासी महिलांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणाने आदिवासी महिलांना त्यांच्या आरोग्य विषयी काही समस्या असल्यास किंवा काही ऑपरेशन करायची गरज भासल्यास अनेक महिलांचे मोफत ऑपरेशन या संस्थेमार्फत केली जाते.त्याचप्रमाणे महिलांना मासिक पाळी यावर समुपदेशन केले जाते.राज्यातील आदिवासी महिलांसाठी अवेअरनेसचे प्रोग्राम घेतले जातात.यामुळे महिलांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जागृती निर्माण होऊन महिलांमध्ये मासिक पाळी मध्ये स्वच्छता कशी राखावी याबद्दल आमची संस्था समुपदेशन करते अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी सुरज विश्वकर्मा , वनिता सुतार उपस्थित होत्या.

टॅग्स :मुंबईयोगासने प्रकार व फायदे