मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर

By Admin | Updated: February 21, 2015 03:07 IST2015-02-21T03:07:14+5:302015-02-21T03:07:14+5:30

मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत.

Mendonso on the way to Shivsena | मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर

मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर

सत्ता समीकरणांमध्ये बदल : भाजपाला वगळून सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेची र्मोचेबांधणी?
राजू काळे ल्ल भार्इंदर
मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. पालिकेची सत्ता सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या हाती आहे. पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाचे १ अपक्षासह ३० नगरसेवक, राष्ट्रवादीचे २६, काँग्रेसचे १७, शिवसेनेचे १५, बहुजन विकास आघाडीचे (बविआ) ३ नगरसेवक आहेत. यातील राष्ट्रवादीचे परशुराम म्हात्रे व वंदना पाटील यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा न देता भाजपात प्रवेश केल्याने सध्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २४ झाली आहे. बविआच्या नगरसेवकांचा भाजपाला पाठिंबा असून सध्याच्या सत्ता समीकरणानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे एकूण ४१ तर भाजपा-शिवसेना-बविआ-अपक्ष व राष्ट्रवादीतून आलेले दोन असे मिळून ५० नगरसेवक आहेत. यावरून, सत्ताधारी आघाडी अल्पमतात तर विरोधात असलेली युती बहुमतात आहे. परंतु, भाजपाने शिवसेनेवर स्थायी समितीमध्ये केलेली कुरघोडी व आमदाराच्या निवडणुकीत आगरी समाजातील व्यक्तींवर केलेला हल्ला शिवसेनेच्या नाराजीला कारणीभूत ठरला आहे. ही नाराजी उघड करण्याची संधी शिवसेनेने यंदाच्या महापौर निवडणुकीनिमित्त साधण्यासाठी मेंडोन्सा यांना आपल्या भगव्या झेंड्याखाली आणण्याचा आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची बातचीत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ़ माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक शिवसेनेत जाण्यास इच्छुक नाहीत. मेंडोन्सा यांनी सेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ३४ किंवा ३६ वर जाणार असली तरी बहुमतासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. (प्रतिनिधी)

च्शिवसेनेला भाजपशिवाय सत्तेत येण्याची इच्छा असल्यामुळे मेंडोंन्सा यांना घेण्यासाठी प्रयत्न सुरू.
च्स्थायी समितीमध्ये भाजपाने केलेल्या कुरघोडीमुळे शिवसेनेमध्ये नाराजी


च्मेंडोन्सा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार असली.
च्सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी काँग्रेसच्या पाठींब्याची आवश्यकता लागेल.

Web Title: Mendonso on the way to Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.