राज ठाकरे यांनी जागवल्या शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:07 IST2021-01-20T04:07:23+5:302021-01-20T04:07:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा, मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जयंतीदिनी ...

Memories of Shiv Sena chief awakened by Raj Thackeray | राज ठाकरे यांनी जागवल्या शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी

राज ठाकरे यांनी जागवल्या शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा, मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी सायंकाळी रोजी सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण मंगळवारी सकाळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन दिले. या १५ मिनिटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समरंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी महापौरांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मलबार हिल येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन त्यांना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

--------------------------------

Web Title: Memories of Shiv Sena chief awakened by Raj Thackeray