मेगामान्सून मॅरेथॉन जोशात;

By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T21:04:08+5:302014-08-24T23:08:29+5:30

मेगामान्सून मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयाच्या मयूर हिंगोळेने तर मुलींच्या गटात कांदिवलीच्या प्रकाश महाविद्यालयाच्या ज्योती पंजाबीने अव्वल स्थान पटकावले.

Megamansun Marathon Josh; | मेगामान्सून मॅरेथॉन जोशात;

मेगामान्सून मॅरेथॉन जोशात;

भाईंदर - येथील शंकर नारायण (एस.एन.) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रविवारी आयोजिण्यात आलेल्या मेगामान्सून मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयाच्या मयूर हिंगोळेने तर मुलींच्या गटात कांदिवलीच्या प्रकाश महाविद्यालयाच्या ज्योती पंजाबीने अव्वल स्थान पटकावले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुंधरा बचाव मोहिमेंतर्गत आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागतिक वैश्विक तापमान वाढीला थांबवण्याचे आवाहन केले. जास्तीतजास्त झाडे लावून हरितवायूचे उत्सर्जन रोखण्याचा संदेश या वेळी सहभागी स्पर्धकांकडून देण्यात आला. मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या ५५६ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेत दोन गट तयार करण्यात आले होते. त्यात मुलांसाठी १० किमी अंतर तर मुलींसाठी ८ किमी अंतर निि›त करण्यात आले होते. सकाळी ८.३० वा.च्या सुमारास मॅरेथॉनसाठी सज्ज असलेल्या स्पर्धकांच्या तांड्याला एस.एन. महाविद्यालयाचे संस्थापकीय अध्यक्ष रोहिदास पाटील व मीरा-भाईंदर सबडिव्हीजनचे पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथमस्थानी उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयाचा मयूर हिंगोळे, द्वितीयस्थानी पालघर येथील एस.डी.एस.एम. महाविद्यालयाचा शैलेश गांगोडा व तृतीयस्थानी आर.के.टी. महाविद्यालयाचाच सतीश रक्ते यांनी बाजी मारली. त्याचप्रमाणे मुलींच्या गटात प्रथमस्थानी कांदिवलीच्या प्रकाश महाविद्यालयाची ज्योती पंजाबी, द्वितीयस्थानी कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाची ऐश्वर्या मिश्रा व तृतीयस्थानी वसईच्या वर्तक महाविद्यालयाची दिव्या पाडवी विजयी ठरल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य महेश म्हात्रे, प्राचार्य डॉ. विष्णू यादव, नगरसेविका कल्पना म्हात्रे, ऑलिम्पिकपटू आनंद मिनेजिस, माजी रणजीपटू संदीप महाडकर, प्राध्यापक सुनील धापसे, सुरेखा मिश्रा आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना तुळशी रोपट्यांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
(फोटो - २४भाईंदर मेगामान्सून मॅरेथॉन)
वाचली - नारायण जाधव

Web Title: Megamansun Marathon Josh;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.