Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज विविध कामांसाठी मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 07:29 IST

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान  मेगाब्लॉक आहे.

मुंबई : विविध कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वे मार्गावर  ठाणे ते कल्याणदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान  मेगाब्लॉक आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर पनवेलदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यानही अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. 

टॅग्स :लोकलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वे