मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

By Admin | Updated: June 12, 2016 04:04 IST2016-06-12T04:04:36+5:302016-06-12T04:04:36+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर तर हार्बरच्या सीएसटी-चुनाभट्टी, वडाळारोड-माहीम मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Megablocks today on the Central, Harbor route | मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर तर हार्बरच्या सीएसटी-चुनाभट्टी, वडाळारोड-माहीम मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे ठाणे-कल्याणदरम्यान वाहतूक धीमी मार्गावर वळवली जाईल. ब्लॉकदरम्यान जलद डाउन लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. हार्बरवर ११.१० ते दुपारी ३.४०
दरम्यान मेगाब्लॉक असेल. या कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सीएसटीसाठी तसेच सीएसटीहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द केल्या जातील. तसेच बांद्रा, अंधेरी ते सीएसटी आणि सीएसटी ते अंधेरी, बांद्रा स्थानकांपर्यंतची लोकल सेवा रद्द करण्यात येईल. त्या कालावधीत प्रवाशांसाठी पनवेल-कुर्ला दोन्ही दिशांवर विशेष लोकल चालवण्यात येतील. त्या लोकल कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक आठवरून सुटतील. तसेच हार्बरच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायं. ६ दरम्यान, पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल, असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Megablocks today on the Central, Harbor route