रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST2021-07-11T04:06:46+5:302021-07-11T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ...

Megablocks today on all three routes of the railway | रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे-कल्याण अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत मेगाब्लॉक आहे. डाउन धीम्या/अर्धजलद मार्गावर मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून त्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद मार्गावरील गाड्या कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील. सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप व डाउन गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक आहे.

डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या कालावधीत वाशी/ बेलापूर / पनवेलकरिता सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द केलेल्या आहेत.

अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वे मार्गावर विविध दुरुस्ती कामांसाठी रविवारी माहीम ते अंधेरी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर १०.३५ ते १५.३५ या वेळेत मेगाब्लॉक आहे.

Web Title: Megablocks today on all three routes of the railway