तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:30+5:302021-02-05T04:23:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३१ जानेवारी ...

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. भायखळा ते माटुंगादरम्यान सर्व स्थानकांवर लाेकल थांबतील. या गाड्या नियोजित वेळापत्रकानंतर १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. माटुंगानंतर जलद सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील.
कुर्ला रेल्वे स्थानकावरून अप जलद उपनगरीय लोकल सेवा सकाळी ११.०६ ते दुपारी ३.४५ या वेळेत माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि भायखळा रेल्वे स्थानकावरून अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या सेवा नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. तर, हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटीहून सुटणारी वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३९ दरम्यान रद्द राहील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सीएसएमटीसाठी एकही लाेकल धावणार नाही. या ब्लॉक कालावधीत कुर्ला रेल्वे स्थानकावरून विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल.
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरीवली आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गांवर वळविण्यात येतील. तसेच यादरम्यान बोरीवली रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लाेकल धावणार नाही.
...................