रविवारी मेगाब्लॉक
By Admin | Updated: January 31, 2015 22:31 IST2015-01-31T22:31:06+5:302015-01-31T22:31:06+5:30
माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गासह हार्बरच्या मानखुर्द-नेरूळ अप/डाऊन या दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी मेगाब्लॉक
डोंबिवली : माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गासह हार्बरच्या मानखुर्द-नेरूळ अप/डाऊन या दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११.३० ते दु. ३.३० या कालावधीत असेल. या कालावधीत मुख्य मार्गावरील डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलदवर वळविण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा ते मुलुंडनंतर पुन्हा ठाण्यापासून पुढे धीम्या मार्गावरून धावणार आहेत. परिणामी, विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांत त्या वेळेत डाऊनवर लोकलची सुविधा (फलाटांअभावी) नसेल, असेही म.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
हार्बरच्या मानखुर्द-नेरूळ मार्गावर ब्लॉक असल्याने त्या कालावधीत सीएसटीहून डाऊनमार्गे वाशी/बेलापूर/पनवेलसाठी तसेच अपमार्गे लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेल-ठाणे या ट्रान्स-हार्बर तसेच हार्बरच्या सीएसटी-मानखुर्द मार्गावर विशेष लोकल चालविणार आहे.
सिग्नल यंत्रणेसह ओव्हरहेड वायर आणि ट्रॅकच्या विविध तांत्रिक कामांनिमित्त सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या दिशेवर पश्चिम रेल्वेचा रविवारी जम्बोब्लॉक असेल. हा ब्लॉक स. १०.३५ ते दु. ३.३५ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या कालावधीत वरील स्थानकांदरम्यानची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच विलेपार्ले स्थानकात फलाटांच्या लांबीअभावी गाड्या दोन वेळा थांबवण्यात येणार असल्याचे जनसंपर्क विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.